Friday, May 3, 2024
HomeUncategorizedराहुरी तालुक्याच्या पूर्व भागात दारू विक्रीचा सुळसुळाट

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात दारू विक्रीचा सुळसुळाट

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये सध्या करोना महामारी भयानक वाढली असून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, सध्या राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये अवैध दारूची विक्री चढ्याभावाने चालू आहे. काही दारूविक्रेते कुठून तरी दारू आणून चढ्याभावाने विक्री करतात. दारूविक्री बंद न झाल्यास काही वर्षांपूर्वी पांगरमलची घटना घडली होती.

तशीच पांगरमलची पुनरवृत्ती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी स्वतः राहुरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी युवक कार्यकर्ते प्रकाशराव खुळे, बाबासाहेब काळे यांनी केली आहे. ते म्हणाले, ज्याप्रमाणे यापूर्वी एलसीबी आणि अन्य खात्यांनी दारू उत्पादक शुल्क खाते यांनी देखील लक्ष घालून ही दारू बंद करावी, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील अनेक युवक कार्यकर्त्यांनी व तरुण वर्गातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या