Friday, May 17, 2024
Homeनाशिकलहान मुलांच्या उपचारासाठी १०० बेडचे रुग्णालय उभारणार

लहान मुलांच्या उपचारासाठी १०० बेडचे रुग्णालय उभारणार

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने लहान मुलांवर कोरोनाचे उपचार करण्यासाठी १०० बेडच्या रुग्णालयाचे नियोजन सुरू करण्यात येत असल्याची माहिती मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत देखील विविध पातळीवर काम करत असताना कोविड सेंटर, मनपा रुग्णालयां मध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून त्या सुविधा दिल्या जात आहेत.

तिसरी येणारी लाट लक्षात घेता त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने साधन सामग्रीचे नियोजन केले जात आहे. तिसरी लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे.

मात्र त्या आजाराने लहान मुले प्रभावीत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.

बिटको रुग्णालयात टप्प्याटप्प्याने १०० बेड करण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने केली जाणार असून त्यास अनुषंगीक साधनसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना सूचना दिलेल्या असून त्यास गती देऊन कोरोनाग्रस्त बालकांसाठी रुग्ण सेवा देण्यासाठी सज्ज करण्यात येईल अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या