अहमदनगर Ahmednagar
करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. शहरातील नागपूर लसीकरण केंद्रांसमोर लस टोचून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
- Advertisement -
दरम्यान, करोना लसीसाठी आरोग्य केंद्राबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने उपाय शोधला होता. ज्यांची ऑनलाईन नोंदणी होईल आणि केंद्रबाहेर लावलेल्या यादीत नाव असेल त्यांनाच लस मिळणार होती.
तसा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी काढला होता. मात्र नागपूर लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारची यादी लावलेली नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.