Friday, May 3, 2024
Homeजळगावव्यापाऱ्याच्या गाडीतून तीन लाखाची बॅग लंपास

व्यापाऱ्याच्या गाडीतून तीन लाखाची बॅग लंपास

जळगाव- jalgaon

किराणा माल (Groceries) घेण्यासाठी आलेल्या होलसेल व्यापाऱ्याला (merchant) तुमच्या गाडीतील हवा कमी होत असल्याचे सांगितले. व्यापारी गाडीचे टायर बघण्यासाठी गाडीतून उतरताच चोरट्याने (stealthily) त्यांच्या गाडीत ठेवलेली ३ लाख ५ हजार रुपयांची रोकड (cash)असलेली बॅग लांबविल्याची (Bag extended) घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दाणा बाजारात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुबा येथे संदीप परदेशी हे वास्तव्यास असून त्यांचे गावात होलसेल किरणामाल विक्रीचे दुकान आहे.  दुकानातील मालाच्या खरेदीसाठी ते आठवडयातून एकदा दाणाबाजारात येतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास (एमएच १९ सी झेड ९२२१) क्रमांकाच्या कारने जळगावात आले. यावेळी त्यांनी सोबत घरून ४ लाख ५ हजार रुपये आणले होते. जळगावात आल्यानंतर त्यांनी अमित ट्रेडर्स या व्यापाऱ्याला १ लाख रुपये दिले आणि त्यानंतर ते दाणाबाजारात नारळाचे पोते घेण्यासाठी गेले.

त्यांनी दुकानातून नारळाचे पोते वाहनात ठेवल्यानंतर ते कार वळवत होते. याचवेळी त्यांच्या वाहनाच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चोरट्याने त्यांना सांगितले की, तुमच्या कारच्या मागील चाकाची हवा ही कमी होत आहे. त्यामुळे परदेशी हे कारच्या खाली उरतले आणि चाक पाहण्‍यासाठी कारच्या मागे गेले.

तेवढयात कारजवळ उभ्या असलेल्या चोरटयाने परदेशी यांनी व्यापा-यांना पेमेंट देण्यासाठी आणलेली ३ लाख ५ हजार रूपये ठेवलेली बॅग लांबवून पसार झाले.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या नंतर गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. 

गाडीत बसताच दिसली नाही बॅग

व्यापारी परदेशी यांनी चाक पाहिल्यानंतर हवा बरोबर आहे, म्हणून पुन्हा कारमध्ये बसण्‍यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्यांची पैशांची बॅग दिसून आली नाही. त्यांनी बाजू-बाजूला तिचा शोध घेतला पण, बॅग मिळून आली नाही. त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

- Advertisment -

ताज्या बातम्या