Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई | Mumbai
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहे. मुंबई ईस्टर्न वे वरील घाटकोपरमधल्या एका पेट्रोल पंपावर भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. तर वडाळा बरकत अली नगर येथे कार पार्किंग लिफ्ट कोसळली आहे. यातील घाटकोपर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने या पंपावरील अनेक वाहने दबली गेली आहेत. ज्यात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास घाटकापोर पूर्व येथील पंतनगरमध्ये पूर्व हायवेवर पोलीस ग्राऊंड पेट्रोल पंप असून येथे हा अपघात घडला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही भली मोठी होर्डिंग ही थेट पेट्रोल पंपावर कोसळले. या होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या चार ते पाच गाड्या आणि पावसापासून बचावासाठी आश्रय घेण्यास आलेले काही नागरिक अडकल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांतही बरसणार

तसेच, दुसऱ्या घटनेत वडाळा येथील बरकत अली नगर येथे ही कार पार्किंग लिफ्ट कोसळली आहे. खालून जाणाऱ्या वाहनांवर ही पार्कींग लिफ्ट कोसळली. या वाहनांमध्ये काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत सध्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

या दोन्ही घटनेमध्ये अपघात घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून युध्दपातळीवर बचावकार्य सुरु असून दबलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या