Saturday, April 26, 2025
HomeनाशिकNashik News : सिटीलिंकच्या चालकांविरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत नाशिकरोड व आडगावला गुन्हे

Nashik News : सिटीलिंकच्या चालकांविरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत नाशिकरोड व आडगावला गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शनिवारी सकाळपासून सिटीलिंकच्या चालकांनी (Citilink Driver) संप पुकारले असून चालकांनी संप मागे घ्यावा, असे वारंवार सांगूनही कामावर न परतणाऱ्या सुमारे ३२ चालकांविरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत (Mesma Act) नाशिकरोड व आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : सिटिलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

प्रशासनाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सतत बैठका होत असल्या तरी अद्याप तोडगा निघातांना दिसत नाही. शहराची लाईफलाईन असलेल्या मनपा सिटीलिंक बससेवा (Citilink Bus) चालकांनी वेतन वाढीसाठी शनिवार (दि. २७) सकाळपासून संप पुकारल्याने बससेवा विस्कळीत झाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात युवक ठार

दरम्यान, मनसेना (MNS) कामगार सेनेतर्फे हा संप पुकारण्यात आला असून शहरातील तपोवन व नाशिकरोड सिटीलिंक बस डेपोत उभ्या आहेत. एकही बस बाहेर दैनंदिन मार्गावर न धावल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून बस कधी चालू होणार? असा सवाल विचारला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...