Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनराखी सावंतचा पती आदिल खान विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

राखी सावंतचा पती आदिल खान विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

बॉलिवूडमधील बहुचर्चित अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल खान (Adil Khan) यांचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर काही दिवसातच त्यांच्यातील वाद आणि अडचणी समोर येऊ लागल्या, कधी त्यांच्यातील बेबनाव तर कधी इतर अन्य कारणांनी ही जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. आता अशाच एका कारणाने राखीचा पती आदिल खान चर्चेत आला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी राखीने पती आदिल याच्यावर मारहाण, फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ शूट करून प्रसारित केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता आदिल खान विरोधात एका विद्यार्थीनीने गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आदिल खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसी (Doctor of Pharmacy) या विषयात शिक्षण घेत होती. तेव्हा तिची आणि आदिल खान यांची ओळख डेजर्ट लॅब फूड अड्डा याठिकाणी झाली. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. ओळखीनंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. त्यानंतर आदिलने लग्नाचे आमिष देत म्हैसूर याठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये भेट झाली.

त्यानंतर त्या विद्यार्थ्यीनीने आदिलवर गंभीर आरोप करत आदिल याच्या विरोधात म्हैसूरच्या (Mysore) व्हीव्ही पूरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...