Saturday, March 29, 2025
Homeधुळेआजोबांना भेटण्यासाठी जाणार्‍या नातवावर काळाची झडप

आजोबांना भेटण्यासाठी जाणार्‍या नातवावर काळाची झडप

धुळे । प्रतिनिधी dhule

सटाणा (Satan) तालुक्यातील बहिराणे येथून धमनार येथे आजोबांना भेटण्यासाठी जाणार्‍या तरूण नातवावर काळाने झडप घातली. त्याच्या दुचाकीला बेहेड गावानजीक भरधाव वाहनाने धडक (accident) दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

समाधान भाऊसाहेब सोनवणे (वय 21 रा. बहिराणे ता. सटाणा जि. नाशिक) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो एमएच 41 बीसी 9724 क्रमांकाच्या दुचाकीने दुपारी तीन वाजेच्या सुमारास बहिराणे येथून बेहेड ते धमनार रस्त्याने धमनार गावी आजोबा आधार भिल यांना भेटण्यासाठी जात होता. त्या दरम्यान सात वाजेच्या सुमारास बेहेड गावाच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून समाधान याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊसाहेब मन्साराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलिसात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकाँ विसपुते करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar ZP : मार्चअखेर ७० कोटी खर्च करण्याचे आव्हान; जिल्हा परिषदेत...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) मार्चएंड म्हणजेच ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवट उरकण्याची धावपळ जिल्हा परिषदेत सुरू आहे. मंजूर निधीपैकी अधिकाधिक निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर...