Sunday, May 26, 2024
Homeजळगावकर्मचारी आत्महत्या प्रकरणी भारती ज्वेलर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

कर्मचारी आत्महत्या प्रकरणी भारती ज्वेलर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

रावेर|प्रतिनिधी –

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारती ज्वेलर्स दुकान मालकाच्या त्रासाला ज्वेलर्सच्या दुकानातुन  काम सोडल्याच्या कारणावरुन एका युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी भारती ज्वेलर्सच्या तिनही मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर शहरातील कासार गल्लीतील रहीवासी (मयत) किशोर सैतवाल (जैन) वय- ४० हा भारती ज्वेलर्समध्ये काम करत होता.त्याने या ज्वेलर्समधुन काम सोडले होते. या कारणावरुन भारती ज्वेलर्सचे मालक १) करण गणवानी २) अनुराग गणवानी ३)महेश गनवाणी हे दि २२ मार्च २०२३ ते दि २७ ऑक्टों२०२३ या दरम्यान किशोर यास वेळो-वेळी मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन मयताचा भाऊ आई यांच्या मोबाईलवर तसेच काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे कामाला परत ये नाही,तर तुझ्यावर चोरीचा आरोप ठेऊन समाजात बदनाम करू व तुला कूठेही काम मिळवु देणार नाही व किशोर याच्या घराजवळ येऊन मारहाण केली.

त्यामुळे भारती ज्वेलर्सच्या तिघा मालकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळुन किशोर याने घराच्या छतास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताची आई रत्नाबाई बाबूराव सैतवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भारती ज्वेलर्सच्या तिघे मालका विरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले पो कॉ संभाजी बिजाग़रे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या