Friday, May 3, 2024
Homeधुळेदोंडाईचातील तरूणी प्रेमाच्या जाळ्यात, लाखाची खंडणी घेवूनही बदनामीची धमकी

दोंडाईचातील तरूणी प्रेमाच्या जाळ्यात, लाखाची खंडणी घेवूनही बदनामीची धमकी

धुळे – प्रतिनिधी dhule

येथील तरूणीला (love) प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला दमदाटी करण्यात आली. प्रकरण मिटविण्यासाठी एक लाखाची खंडणीही उकळली. त्यानंतरही घरी येवून तिच्यासह कुटुंबियांना बदनामीची धमकी देणार्‍या (aurangabad) औरंगाबादच्या एकावर (police) पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत 27 वर्षीय तरूणीने काल (police) पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सन 2012 पासून दि.3 एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला. मनोज भानुदास सांगळे (रा.हर्सुल सांगवी जि.औरंगाबाद) याने तरूणीशी ऑनलाईनच्या (Online) माध्यमातून संपर्क साधून त्याचे लग्न झालेले असतांना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.

वेळोवेळी ऑनलाईन चॅटींग करून जिवे मारण्याची धमकी देवून विनयभंग केला. तिच्या मागावर राहून प्रकरण मिटविण्याकरीता तरूणीकडे पाच लाख रूपयांची मागणी केली. तिच्याकडून एक लाख रूपये घेवून देखील तरूणीच्या घरी येवून तिच्यासह आई-वडीलांना बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावरून आरोपीवर विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास (PI Durgesh Tiwari) पीआय दुर्गेश तिवारी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या