नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘स्टोन वॉटर रिसॉर्ट’ हे भाडे तत्त्वावर देण्याची बोलणी करुन त्यासाठी वेळोवेळी ३६ लाख रुपये घेऊनही रिसॉर्टचा (Resort) ताबा न दिल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत (Indiranagar Police) गुन्हा नोंद झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Fraud News : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत सव्वा काेटी रुपये उकळले
याबाबत अधिक माहिती अशी की, हितेश राजकुमार अच्छरा (वय ३२, रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रमोद वसंत कुटे (३९, रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा (Case) नोंद आहे. कुटे यांनी २७ मे २०२२ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत अच्छरा यांच्याकडून पैसे घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पंधराशे महिलांना लाखाेंचा गंडा; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा उद्याेग
तर, दुसऱ्या गुन्ह्यात फ्लॅटच्या ताब्यावरुन बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वडाळा रस्त्यावरील ओजस एव्हेन्यु अपार्टमेंटमधील एका फ्लॅटच्या ताब्यावरुन बिल्डरविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. अजय बापूराव खैरनार (वय ५०, रा. इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सराईत घरफाेड्या ताब्यात; १२ लाखांचे साेने हस्तगत
त्यानुसार श्रीपाद ठोमरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. दरम्यान, खैरनार यांनी बँकेतील आर्थिक व्यवहारांनुसार फ्लॅटचा ताबा घेतला आहे. मात्र, बिल्डर (Builder) ठोमरे याच्याकडेच त्याचा ताबा आहे. त्यांच्या वादातून हा गुन्हा नोंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सुरु करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा