नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इंदिरानगर (Indiranagar) येथील कोटक महिंद्रा बँकेत (Kotak Mahindra Bank) ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोटांचा भरणा करण्यात आल्याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी तक्रार केली आहे.इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बनावट नोटांची सत्यता पडताळली जाणार आहे.
इंदिरानगर परिसरात (Indiranagar Area) असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्निल सुनील नगरकर (रा. अमृतधाम, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ३ जून रोजी त्यांच्या शाखेमध्ये सुबोध सुधीर रत्नपारखे (रा. वडाळा-पाथर्डी रोड) हे सकाळी पैशांचा भरणा करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या साम ५०० रुपयांच्या बनावट १३ नोटा (Fake Currnecy) असल्याचे निदर्शनास आले.
हे देखील वाचा : नाशकातील पासपाेर्ट एजंटांवर सीबीआयचे छापे
या नोटा त्यांना नगर जिल्ह्यातील (Nagar District) अकोले हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने दिल्या होत्या.या नोटा बनावट असल्याचा संशय आल्याने रत्नपारखे व बँकेच्या कॅशियर अंकिता गायकवाड यांनी ही बाब शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकांनी इंदिरानगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटांची सतत्या पडताळून पाहण्यासाठी त्यांची शहानिशा केली जाणार आहे.
बँकेत आलेल्या भरणात ५०० रुपयांच्या १३ नोटा बनावट असल्याचा दावा बँकेचा आहे. प्रकरणात सत्यता पडताळून पुढील आवश्यक तपास केला जाईल.
अशोक शेरमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा