Saturday, May 9, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; कुणाचे पारडे...

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज (मंगळवारी) मुंबई इंडियन्स संघासमोर राजस्थान रॉयल्सचे (Mumbai Indians and Rajasthan Royals) आव्हान असणार आहे. गुवाहाटी (Guwahati) येथील बरसापारा क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार असून, प्रथमच सामना खेळणार आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्स संघाचा नियमित कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. शनिवारी ४ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सामन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने माघार घेतली होती. मुंबई इंडियन्सला अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला असल्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असणार आहे.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करून आयपीएल स्पर्धेमध्ये दणक्यात सुरुवात केली आहे. आता स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन करण्याची संधी राजस्थान रॉयल्स कडे असणार आहे. संघाचे कर्णधारपद रियान परागकडे (Riyan Parag) सोपविण्यात आले आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये दोन्ही संघ ३१ वेळा आमनेसामने आले असून, मुंबई इंडियन्सने १६-१४ फरकाने सरशी साधली आहे. अखेरच्या ४ सामन्यांचा निकाल पाहिल्यास दोन्ही संघ २-२ सामन्यात विजयी झाले आहेत. आजच्या सामन्यात वैभव सुर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, सूर्य कुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यावर लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्या

अ‍ॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

0
येवला | प्रतिनिधी Yeola तालुक्यातील देवळाणे येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांचेवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत....