धुळे । Dhule। प्रतिनिधी
- Advertisement -
तालुक्यातील अजनाळे येथे विजेचा खांब (Electric pole) अचानक डोक्यावर पडून (Electric pole) बालकाचा (child) मृत्यू (Death) झाला आहे. ही दुर्देवी घटना काल सकाळी घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाजीराव उर्फ बारक्या शोरगोळ्या भोसले (वय 13 रा. अजनाळे) असे मयत बालकाचे नाव आहे. तो गल्लीतील मुलांसोबत घराजवळील उंबराच्या झाडासमोरील सिमेंटच्या इलेक्ट्रीक पोलजवळ खेळत होता. त्यादरम्यान सिमेंटचा पोल अचानक कोसळून थेट बालकाच्या डोक्यातच पडला.
ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी धावत येवून बालकाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे डॉ. एजाज अहमद यांनी तपासणी करून बालकाला मृत घोषित केले. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली असून तपास महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार करीत आहेत.