Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमचॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार करून केला खून

चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार करून केला खून

जामनेर – प्रतिनिधी jamner
तालुक्यातील चिंचखेडा येथे एका सहा वर्षाच्या बालिकेवर चॉकलेटचे आमिष दाखवून ३६ वर्षाच्या एका नराधमाने बालिकेला गावाच्या बाहेर असलेल्या केळीच्या बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. राक्षसी प्रवृत्तीच्या हा नराधम इथेच थांबला नाही तर त्याने बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करून तो पसार झाला आहे. बालिकेच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला 302 चा गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल राहणार चिंचखेडा हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

तालुक्यातील चिंचखेडा येथे भिल्ल कुटुंब राहत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोल मजुरी करून परिवारातील सदस्य मजुरीसाठी दिवसभर बाहेर असतात. दि.11 जूनला देखील कुटुंबातील चिमुकलीचे आई-वडील व सर्व सदस्य हे मोलमजुरीसाठी घराबाहेर होते. घरात सहा वर्षाची एक चिमुकली एकटीच होती. चिमुकलीला घरात एकटीच पाहून गावातीलच 36 वर्षाचा लिंग पिसाट नराधम सुभाष भिल याचे मनात राक्षसी प्रवृत्ती जागृत झाली. त्याने चिमुकलीला तुला चॉकलेट घेऊन देतो असे सांगत चॉकलेटचे आमिष दाखवून गावाबाहेर असलेल्या केळीच्या बागेत घेऊन गेला व त्या ठिकाणी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून त्याने तिचा गळा दाबून खून केला. 11 जूनच्या संध्याकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून तेव्हापासून आरोपी हा गावातून फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान याप्रकरणी आरोपी सुभाष इमाजी भील वय 36 राहणार चिंचखेडा याच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस उपाधीक्षक चाळीसगाव, डीवायएसपी पाचोरा विभाग, जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून मयत बालिकेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे नेण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : व्यावसायिकाच्या घरी जबरी चोरीचा प्रयत्न

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील साईनगर, बुरूडगाव रस्ता येथे 22 मार्च रोजी पहाटे चार अज्ञात इसमांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिक...