Wednesday, March 26, 2025
Homeजळगावनाल्यात चेंडू काढायला गेलेला बालक वाहून गेला

नाल्यात चेंडू काढायला गेलेला बालक वाहून गेला

जळगाव – प्रतिनिधी
जळगाव शहराला आज दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. अर्धा पाऊन तासातच शहरातील रस्ते जलमय झाले. यात शहरातील खंडेराव नगर परिसरात आरएमएस कॉलनीजवळ नाल्यात पडलेला चेंडू घेण्यासाठी वाहत्या पाण्यात उतरलेला सहा वर्षीय बालक वाहून गेल्याची धक्कादायक घटना दि.6 जुलै रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बालकाचा शोध घेत आहे.

सचिन राहुल पवार (वय 6, रा. हरिविठल नगर, नवनाथ मंदिराजवळ, जळगाव, मूळ रा. कुसुंबा ता. रावेर) असे मयत बालकाचे नाव आहे. हरिविठ्ठल नगरात राहुल किसन पवार (वय 32) हे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, 1 मुलगा सचिन, 1 मुलगी असा परिवार आहे.

- Advertisement -

शनिवारी दि.6 जुलै रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान, खंडेराव नगर परिसरात सचिन पवार हा बालक त्याची 10 वर्षाची बहीण आणि परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेला होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळू लागले. खेळताना अचानक चेंडू जवळच्या नाल्यात पडला. तो घेण्यासाठी सचिन पवार हा नाल्यात उतरला. मात्र नुकताच पाऊस पडल्याने व नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात वाहत असल्याने निष्पाप सचिनला त्याची कल्पना आली नाही. तो वाहत्या पाण्यात वाहून गेला.

यावेळी लहान मुलांनी आरडाओरडा करून नागरिकांनी माहिती दिली. सचिनचे कुटुंबीयदेखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत तो पाण्यात वाहून गेल्याने त्याचा शोध लागत नव्हता. रामानंद नगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पट्टीच्या पोहणार्‍या तरुणांना बोलावून सचिन पवारचा शोध सुरु केला आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा सचिनचा मृतदेह हाती आला नव्हता. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून सचिनचे कुटुंबियांना धक्का बसला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Eknath Shinde: शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; एकनाथ...

0
मुंबई | Mumbaiएकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलेच नाही, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती....