धुळे । Dhule। प्रतिनिधी
शहरानजीक असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतीत (Awadhan Industrial Estate) चोरट्यांनी (thieves) धाडसी चोरी केली आहे. श्री स्वामी समर्थ रोडवेजच्या (Sri Swami Samarth Roadways) गोडावूनची भिंतीला (Godavon’s wall) होल पाडत दीड लाखांचे कॉपर वायरचे (copper wire) बंडल लंपास केले. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे.
याबाबत ट्रॉन्सपोर्ट व्यावसायीक अक्षय भिमराव वरवटे (वय 25 रा. 36 पार्वती नगर, शासकीय दुध डेअरी रोड, धुळे) यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे अवधान औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं.28 मध्ये श्री स्वामी समर्थ रोडवेज नावाचे गोडावून आहे. दि.17 रोजी अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या दक्षिणेतील भिंतीस लोखंडी किंवा इतर कुठल्यातरी वस्तुने एक मनुष्य प्रवेश करेल, एवढे होल पाडले.
त्यातून आत प्रवेश करीत गोडावूनमधून कॉपर वाईडींग बंडलचे एकुण आठ बॉक्स चोरून नेले. 1 लाख 57 हजार 460 रूपये त्यांची किंमत आहे. याप्रकरणी काल अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोना पाटील तपास करीत आहेत.