नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मद्यधुंद अवस्थेतील समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकाने भरधाव गाडी (Cars) चालवत दोन चारचाकींसह दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार घडला. घटनेनंतर अधीक्षकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांच्या (Police) ताब्यात देणे शक्य झाले. या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर
राज्यभरात हिट ॲण्ड रनच्या (Hit and Run) घटना उघडकीस येत असून भद्रकाली पोलीस ठाणे (Bhadrakali Police Station) हद्दीतही अशा प्रकारची घटना उघडकीस आली. समाजकल्याण विभागाचा अधीक्षक विजय चव्हाण हा मद्याच्या नशेत होता की त्याला गाडी चालवणे अवघड झाले आणि गाडीवरील ताबा सुटला अन् जो समोर येईल त्याला त्याने धडक दिली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी संतप्त लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हे देखील वाचा : Eknath Khadse : निमंत्रण मिळाले तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही; खडसे असं का म्हणाले?
पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी याबाबत माहिती दिली असून शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेदहाच्या सुमारास विजय चव्हाण (५६) मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. काठे गल्ली सिग्नलसमोरील पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ येताच त्याचा गाडीवरील ताबा सुटला. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांना त्याने जोरदार धडक दिली. तसेच दुचाकीलाही धडक दिली. यात सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, विजय चव्हाणला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा