Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedचेक बाऊन्स झाला म्हणून विनयभंगाची खोटी तक्रार पडली महागात

चेक बाऊन्स झाला म्हणून विनयभंगाची खोटी तक्रार पडली महागात

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

आयव्हीएफची ट्रीटमेंट घेऊन प्रक्रियेचे पैसे देण्यास टाळाटाळ करत उलट डॉक्टरांवरच विनयभंगाची तक्रार करणे मोटे दाम्पत्याला चांगलेच महागात पडले. मुंबई उच्च न्यायालयाने विविध ताशेरे ओढत विक्रमी वेळेत रुग्णाची याचिका खारीज केली. या प्रकरणात टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ डॉ. राजेंद्र बोलधने यांना दिलासा देत मोटे दाम्पत्याला हाय होल्टेज झटका दिला. 

- Advertisement -

शहरातील मयूर कॉलनीत राहणारे गीतांजली आणि योगेश मोटे या दाम्पत्याची वंध्यत्वाचे उपचार जून २०२२ मध्ये झाले. टेस्ट ट्यूब बेबीची (आयव्हीएफ) प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आमच्याकडे पैसे नाहीत, असे म्हणत रुग्णाचे सासरे मोटे यांनी विनंती करून वीस आणि पंचवीस हजार असे दोन पोस्ट डेटेड चेक (पीडीसी) जुलै २०२२ च्या तारखेने दिले. माणुसकीच्या नात्याने जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका डॉ. शिल्पा बोलधने यांनी त्यांची विनंती मान्य केली. तारीख उलटून गेल्यावर हॉस्पिटलच्या अकाऊंट विभागाने एक चेक इनकॅश करण्याचा प्रयत्न केला पण तो चेक बाऊन्स झाला.

टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी दाम्पत्याचे सासरे, सून गीतांजली मोटे आणि मुलगा योगेश मोटे यांनी जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घालून विनयभंगाची खोटी एफआयआर केली. कुठलेही पुरावे नाही म्हणून एफआयआर करायला सुरुवातीला पोलिसांनी नकार दिला होता. रुग्ण व रुग्णाचे नातेवाईकांनी डॉक्टरांना स्वतःच शिवीगाळ करायची व उलट डॉक्टरांनी आम्हाला शिवीगाळी केली, अश्लील मेसेज पाठवले असे पोलिसांना जाऊन सांगणे, असेही प्रकार या रुग्णाने केले.

औरंगाबाद खंडपीठात विक्रमी वेळेत रुग्णाची याचिका खारीज

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय देशमुख आणि न्यायमूर्ती आर.जी.अवचट यांच्यासमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर हायकोर्टाने खालील ऑबजर्वेशन देत रुग्णाची याचिका स्क्वॅश केली. आम्हाला ही गोष्ट समजत नाही की रुग्णाने झालेल्या विनयभंगाची तक्रार तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आलेल्या आपल्या पतीला किंवा सासऱ्यांना का सांगितली नाही. त्यांना सहा महिने झालेला विलंब त्यांच्या बुद्धिमत्तेला अजिबात पटणारे नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

हायकोर्टाच्या आदरणीय बेंचने असेही ऑब्जर केले की रुग्णाच्या सासऱ्याने जुलै २०२२ मध्ये पोस्ट डेटेड चेक दिला जो रुग्णाने तयार केल्यानंतरचा महिना आहे. आणि हा चेक डिस-ऑनर झाला हा एक मोठा फॅक्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा आणि सहा महिन्यांचा विलंब. ज्या दरम्यान रुग्णाने पती आणि सासरे यांनाही सांगितल नाही. याचा विचार करता ही स्क्वॅश नाही केली तर डॉ. राजेंद्र बोलधने यांच्यावर Abuse of Process of court होईल असे म्हणत एफआयआर स्क्वॅश केली. डॉ. बोलधने यांच्या वतीने न्यायालयात ऍड. संतोष भोसले यांनी भक्कमपणे बाजू मांडली.

कुठलेही पुरावे नसताना डॉक्टरांविरुद्ध खोट्या तक्रारी करणाऱ्या रुग्णांना समाजाने तसेच मीडियाने महत्त्व देऊ नये. डॉक्टरांनी खूप परिश्रम घेत आपली प्रॅक्टिस डेव्हलप केलेली असते.

-डॉ. यशवंत गाडे

अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद

डॉ राजेंद्र बोलधने एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. जिद्दीने, कष्टाने आणि आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर स्वतःला टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ (आयव्हीएफ कन्सल्टंट) म्हणून पंधरा वर्षे अथक परिश्रम घेऊन स्वतःला स्टेबलिश करतो आणि मोटे नावाचा कोणतातरी रुग्ण खोटी प्रकार करून प्रचंड बदनामी करतो ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे, अशा रुग्णांना चाप बसण्यासाठी सरकारने कडक कायदा करावा.

डॉ. सतीश पत्की,

प्रसिद्ध आयव्हीएफ तज्ञ, कोल्हापूर

पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

मोटे दाम्पत्याच्या खोट्या तक्रारीमुळे प्रसिद्ध वंध्यत्व व टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ डॉ. राजेंद्र बोलधने यांची बदनामी झाली. त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्ही ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार आहोत.

-डॉ. शिल्पा बोलधने

मॅनेजिंग डायरेक्टर, जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या