Sunday, June 14, 2026
HomeनगरAMC : डॉ. बोरगे प्रकरणी न्यायालयात हरकत घेणार

AMC : डॉ. बोरगे प्रकरणी न्यायालयात हरकत घेणार

आयुक्त डांगे यांची माहिती || उपस्थित केले विविध प्रश्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आरोग्य विभागातील अपहार प्रकरणातील गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याबाबत पोलीस प्रशासनाने न्यायालयात दाखल केलेल्या पत्राला महानगरपालिकेमार्फत कायदेशीर हरकत व आक्षेप घेतला जाणार आहे. गुन्ह्यातून त्यांचे नाव वगळण्याचा निर्णय अद्याप न्यायालयाने दिलेला नाही. याप्रकरणी महानगरपालिका न्यायालयात योग्य ती भूमिका मांडेल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, डॉ. बोरगे यांनी स्वतःच हा अपहार उघड केल्याचा दावा ते करत असतील, तर आरोग्य विभागाचे जबाबदार अधिकारी व विभागप्रमुख म्हणून त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही? अद्याप अपहरणाची रक्कम वसूल का झाली नाही? डॉ. बोरगे यांनी दीड वर्ष यावर मौन का बाळगले? त्यांना आत्ताच पश्चातापबुद्धी कशी सुचली? असे सवालही आयुक्त डांगे यांनी उपस्थित केले आहेत. आरोग्य विभागातील 16.50 लाखांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी तपास करून त्यात डॉ. बोरगे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे म्हटले आहे.

प्रत्यक्षात खात्यातील व्यवहाराबाबत दोघांची जबाबदारी आहे. निधी वापराबाबत तत्कालीन शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे याने निधी वर्ग करण्याबाबत त्यांच्या यूजर आयडीवरून केलेल्या कार्यवाहीला अथवा प्रस्तावाला विभाग प्रमुख म्हणून डॉ. बोरगे यांनी त्यांच्या आयडीवरून मंजुरी दिल्यावर खात्यावरील व्यवहार होणे अपेक्षित आहे. मात्र, बोरगे यांनी यात विभागप्रमुख म्हणून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केला आहे. रणदिवे यानेच दोन्ही युजर आयडी वापरून पैसे वर्ग केले. यावरून विभागप्रमुख म्हणून बोरगे यांचे कोणतेही नियंत्रण नव्हते व त्यांनीच दोन्ही आयडी वापरायला दिल्याचे दिसते व हे संगनमतच असल्याचा दावा डांगे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...