धुळे – dhule
- Advertisement -
शहरातील अकबर चौकातील प्लास्टिक वस्तूंच्या (Plastic items) दुकानाला आज सकाळी आग (fire) लागली. घटना वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी हानी टळली.
याआगीत दहा हजारांचे नुकसान झाले आहे. अकबर चौकात इमरान मोहम्मद हुसेन यांचे रियल फॅन्सी पॉईंट व प्लास्टिक नावाचे दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी दुकान उघडले. त्यानंतर ते प्लास्टिकचे साहित्य घेण्यासाठी गेले होते.
पंधरा मिनिटात परत आले तेव्हा दुकानात आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आग विझवली. प्रसंगी परिसरातील नागरिक ही मदतीला धावून आले होते. दुकानात आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी हानी टळली आहे. तरी आगीत दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.