Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजधावत्या मालवाहू वाहनाला आग

धावत्या मालवाहू वाहनाला आग

- Advertisement -

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर एल अँड टी फाट्याजवळील उड्डाण पूलानजीक धावत्या छोटा हत्ती वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना आज (दि.5) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र, वाहनाची केबीन व संपूर्ण मशीन या आगीत जळून खाक झाले.

सिन्नर शहरात राहणारे रोशन पोपट लोणारे हे फळ विक्रीचे काम करतात. दररोज नाशिक येथून फळे घेऊन येत सिन्नरमधील फळ विक्रेत्यांना त्याचे वाटप करतात. नेहमीप्रमाणे लोणारे नाशिकहून फळे घेऊन छोटा हत्ती क्र. एम. एच. 15/ जे. सी. 8045 ने सिन्नरकडे येत होते. दीड वाजेच्या सुमारास एल. अँड टी. फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ आले असता अचानक वाहनाच्या पुढील बाजूला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर लोणारे प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडले.

वाहनामध्ये सफरचंदाचे व इतर फळांचे बॉक्स असल्याने त्यांनी तात्काळ फळांचे बॉक्स खाली उतरवण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणार्‍या वाहनधारकांनीही त्यांना मदत केली. आगीची माहिती एमआयडीसी अग्निशमन विभागाला समजताच फायर ऑफिसर अतुल सोनवणे यांनी जवानांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, काही वेळातच वाहनाची पुढील बाजू आगीच्या भक्षस्थानी पडली होती.

त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी दोन बंबाच्या सहाय्याने अर्धा तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण आणण्यास जवानांना यश मिळाले. इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या लाला वाल्मीकी, आकाश देवकर, नवनाथ जोंधळे यांनी आग अटोक्यात आणण्यात महत्वाची भुमिका बजावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...