Monday, November 25, 2024
HomeनाशिकNashik Crime News : माजी नगरसेविकेच्या घरात चाेरी; एक काेटींचे दागिने लंपास

Nashik Crime News : माजी नगरसेविकेच्या घरात चाेरी; एक काेटींचे दागिने लंपास

चाेरटे सीसीटीव्हीत कैद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राका काॅलनीतीस नवकार रेसिडेन्सीत राहणाऱ्या माजी नगरसेविका डॉ. ममता शैलेंद्र पाटील यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी (Thieves) सुमारे १ किलोहून अधिक वजनाचे रूपयांचे दागिने, विदेशी चलन व सुमारे दीड लाख रुपये लंपास केले. चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी चेहर्‍यावर मास्क लावल्याचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये कैद झाले आहे. चोरट्यांनी चोरीनंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआरसुद्धा लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkar Wada Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Sinnar News : दुचाकीस्वारास मारहाण करून रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. पाटील यांच्या फ्लॅटभोवती लोखंडी ग्रीलची सुरक्षेसाठी लावण्यात आली आहे. तसेच उंबरठ्यावरच उजव्या कोपर्‍यात सीसीटीव्ही कॅमेराही बसविण्यात आला आहे. चोरांनी लोखंडी ग्रील तोडल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटाची तोडफोड करत सोन्याच्या दागिण्यांसह हिरेजडीत एकापेक्षा अधिक मंगळसूत्र, एक ते दीड लाख रूपयांची रोकड, १८०० अमेरिकन डाॅलर असा सुमारे एक कोटी रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा : इगतपुरीत भरदिवसा खून; भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाने भावाला संपवलं

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट देत दिली. याप्रकरणी डॉ. शैलेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात सायंकाळी दाखल करण्यात आला. दरम्यान, चाेरट्यांच्या शाेधार्थ तांत्रिक विश्लेषण सुरु करण्यात आले असून विविध पथके (Squad) तयार केली जात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या