मलकापूर – malkapur
नॅशनल हायवे (National Highway) क्रमांक सहावर झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात झाल्याची घटना घडली आहे. आयशर क्र. MH-18-BG- 0881 चा चालक नामे किरण खंड भदाणे, वय अंदाजे 42 वर्षे रा.अमराळे ता. सिंदखेडा जि. धुळे याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून रस्त्याची परिस्थिती न पाहता तसेच हंस ट्रॅव्हल्स लक्झरी MP-09-FA-8351 च्या चालकाने त्याचे वाहन धोकादायकरित्या रोडचे मधोमध उभे केल्याने आयशरच्या चालकाने हंस ट्रॅव्हल्स लक्झरी क्र. MP-09-FA-8351 ला धडक दिल्याने हंस लक्झरी पुढे जावून आमच्या महिंद्रा लक्झरी क्र. AR-01-R-0525 चा बाहेर उभा असलेला चालक राजुभाई ऊर्फ हरीष लल्लुभाई जाधव यास हंस लक्दारीची जबर धडक बसल्याने तो जागीच मरण पावला.
सदर आयशर डीव्हायडरला धडकुन आमचे दोन्ही लक्झरीचे समोरुन जावुन उजव्या बाजूने वळन घेवुन रोडच्या कडेला कच्चा स्नुपवर उभी असलेली महिला नामे अंजली आकाश जाधव (मोहिते) वय अं. 27 वर्ष हिंस धडक मारुन जखमी करुन नमुद आयशर ही खाली सर्विस रोडवर जोरात आदडल्याने आयशरचा ड्रॉयव्हर नामे किरण खंडु भदाणे वय अंदाजे 42 वर्षे आणि त्याचे सोबत असलेला सिताराम ऊर्फ अप्पा राम बारेला वय अं 55 वर्ष दोन्ही रा. अमराळे ता.सिंदखेडा जि.धुळे असे जागीच मरण पावले तरी आयशर क्रमांक MH-18-BG-0881 चा चालक नामे किरण खंड भदाणे, वय अंदाजे 42 वर्षे रा.अमराळे ता.सिंदखेडा जि. धुळे याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून रस्त्याची परिस्थिती न पाहला अपघात घडवून वर नमुद मृतकांचे मरणास व स्वतःचे मरणास कारणीभूत झाला आहे. तसेच हंस ट्रॅव्हल्स लक्झरी क्र. MP-09- FA-8351 चा चालकाने त्याचे वाहन धोकादायकरित्या रोडचे मधोमध उभे केल्याने अपघात होवुन वर नमुद मृतकांचे मरणास कारणीभूत झाला आहे. अशा फि नदीमखान नईमखान पठाण वय 34 रा.अमरोली कोसाड आवास बिल्डिंग ब्लाॅक नं H5, बिल्डिंग नं.399 घर क्रं.A3 ता.जि.सुरत याने दिलेल्या रिपोर्ट वरुन 1)आयशर क्रं MH-18-BG -0 881चा चालक किरण खंड भदाणे, 2) हंस ट्रॅव्हल्स लक्झरी क्रं. MP 09 FA 83 51 चा चालक यांचे विरुद्ध अप नंबर 343/23 कलम 279, 304 (अ) 283 भादवि सह कलम 184,134,187 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन शहर पो. नि. अशोक रत्नपारखी यांच्या आदेशाने प्राथमिक तपास पोउपनि नरेंद्रसिंग ठाकुर यांचे कडे देण्यात येवुन प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर सपोनि म्हसाये यांचेकडे देण्यात आला आहे.