नांदगाव | Nandgaon
नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. अप लाईनवर डबा घसरल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ७ वाजता नांदगाव यार्डजवळ ही घटना घडली आहे. मुख्य अप मार्गावर मालगाडीचे डबे रुळावरून घसरले आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून डबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मनमाडवरून दुरुस्ती वाहन आणि तांत्रिक पथक आले आहे.
यामुळे राजधानी एक्सप्रेस, धुळे दादर मेमू गाड्याचा झाला खोळंबा झाला आहे. मालगाडीतून सिमेंटची वाहतूक सुरू होती. ही मालगाडी दौंडच्या दिशेने जात होती. मालगाडीचा घसरलेला डबा उचलण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहेत. मनमाडवरून रेल्वेचे हायड्रोलिक इन्स्ट्रुमेंट आणि अपघात विभागाचे पथक घटनास्थळावर दाखल झाले आहे. रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्ग थोड्यावेळासाठी बंद ठेवण्यात आले असून घसरलेला डब्बा उचलण्याचे काम सुरु आहे.
४ तासांनी रेल्वे वाहतुक पुर्वपदावर
सकाळी ७ वाजता नांदगाव स्थानका नजीक मालगाडीचा एक डब्बा रुळावरून खाली उतरल्याने रेल्वे वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती. दरम्यान चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे. नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला होता. या अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे रेल्वेच्या वेळापत्रकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मालगाडी रुळावरून घसरल्याने गाड्या एकाच जागी थांबल्या आहेत. दौंड स्थानकावर सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या धुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजधानी एक्स्प्रेस सह अनेक रेल्वे प्रमुख गाड्या खोळंबल्या होत्या. तर रेल्वे गाड्या उशिराने सोडण्यात आले आहे…रेल्वे रुळावरून घसरलेला डब्बा बाजूला करून वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे..




