Saturday, July 27, 2024
Homeनाशिकवंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक | प्रतिनिधी

सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात कंत्राटीकरणाच्या विरोधासह शैक्षणिक विविध मागण्यांसाठी भव्य एल्गार मोर्चाचे ‘ आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी केजी ते पिजी मोफत शिक्षण, सरकारी क्षेत्रातील कंत्राटीकरण बंद करावे राज्यशासनाच्या सर्व परीक्षांसाठी एकच परिक्षा शुल्क आकारण्यात यावे,राज्यसेवा व सरळ सेवा पदभरती एमपीएससीच्या मार्फत करण्यासाठी आयोगाला अध्यक्ष व इतर अधिकारी मोठ्या संख्येत नियुक्त करावे, स्पर्धा परिक्षेसाठी वाढीव फी रद्द करण्यात यावी, पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा. त्यात अजामीनपात्र व राज्याचे विरुद्ध द्रोह केल्याचे कलम समाविष्ट करावे,शिक्षण हक्क कायद्यानुसार १ ली ते १० वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण करून ह्या आधी शिक्षण दिलेल्या शाळांची थकित संपूर्ण रक्कम अदा करावी, आदी विविध अनेक मुद्‌यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

”शरद पवारच खरे ओबीसी नेते”; बच्चू कडूंचे विधान

त्याच पद्धतीने खाजगीकरणाबाबत भाजपा सरकार हे जनतेची खोटी आश्वासने देवून दिशाभूल करत असल्याचा आरोप करत दिवाळी अधिवेशनात संबंधित जि.आर काढून खाजगीकरण रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी मार्फत मोठया संख्येने तीव्र आंदोलने करण्याचा इशारा देखिल यांनी दिला आहे.

सुजात आंबेडकरांसह नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार, नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे, युवा राज्य सदस्य चेतन गांगुर्डे, महाराष्ट्र सचिव वामनदादा गायकवाड, उर्मिला गायकवाड,पंडित नेटावटे, बाळासाहेब शिंदे संविधान गांगुर्डे, मिहीर गजबे आदी अनेक पाधिका यांनी आंदोलकांसमोर मनोगत व्यक्त केले.

ग्रामपंचायत सदस्य मासिक मीटिंगचा भत्ता देणार लोकप्रतिनिधींना

या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे रवि पगारे, महासचिव दिपक पगारे, अमोल चंद्रमोरे, दिलीप खरात, शिशुपाल गवई, विजय गायकवाड, विशाल भवार, युवराज मनेरे, दिपक दोंदे, साहेबराव शिंदे, सनीजी जाधव, ज्ञानेश्वर वाहुळे, शशि वाघमारे, सुनील साळवे सुरज गांगुर्डे तुकाराम मोजाड ओंकार चव्हाण, संतोष शिराळ आदी पदाधिकारी व कार्यकार्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या