मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू पाच दिवसानंतरही अनेकांना त्यांचे निधन झाले आहे, यावर विश्वास बसत नाही. अजितदादांच्या निधनानंतर विरोधकांमधून काही नेतेमंडळींनी हा अपघात नाहीतर घातपात असल्याचे स्पष्ट सांगितले. परंतु, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतीलच नेते, प्रवक्ते या घटनेची चौकशीची मागणी करताना पाहायला मिळत आहेत. या अपघाताचा घटनाक्रम आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात सुरुवातीला अजितदादांसह सहा जण ठार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांना प्रसारित केले होते. तसेच वैमानिकाच्या बद्दलही चुकीची माहिती प्रसारित केली होती. त्यावरुन अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीतील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत शंका व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहे. मिटकरींनी यांनी तर सीआयडी चौकशीशिवाय या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मिटकरींनी या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करण्यासाठी मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुद्धा यांची भेट घेणार आहे. परंतु, सुनेत्रा पवार यांच्याशी बोलल्यानंतर हा निर्णय घेणार असल्याचे अमोल मिटकरी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनीही या अपघातावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. ते म्हणाले की अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य असून विमान अपघातातला सहावा माणूस कोण ? आणि तो कुठे गेला ? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी खडसे यांनी केली आहे.





