Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपाथरे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

पाथरे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

पाथरे | वार्ताहर Pathare

- Advertisement -

येथील चिने वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

YouTube video player

परिसरात बिबट्याच्या सततच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उसाची दाट शेती, रात्रीच्या वेळी होणार्‍या हालचाली आणि शेतकर्‍यांना शेतीची कामे करताना येणार्‍या अडचणी यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती वाढली होती. परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती असून हीच शेती बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल ठरत असल्याने त्यांचा वावर वाढला होता. यामुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत होती.

या पार्श्वभूमीवर शेतकरी हेमंत चिने यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. सोमवारी बिबट्या या पिंजर्‍यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. बिबट्या अंदाजे सात ते आठ वर्षे वयाचा असल्याचे वनविभागाने सांगितले. वनपाल तानाजी भुजबळ, फैजअली सय्यद, आकाश रुपवते, रोहित लोणारे, निखिल वैद्य, नारायण वैद्य व जगन जाधव यांनी बिबट्याला पकडण्यासाठी परिश्रम घेतले. पथकाने बिबट्याला वैद्यकीय उपचार व निरीक्षणासाठी मोहदरी वन उद्यान येथे हलवले आहे.

दरम्यान, परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

नाशिककरांच्या प्रतिसादाने ‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ हाऊसफुल्ल!

0
​नाशिक | प्रतिनिधी Nashik ​दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’मध्ये प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी सुटीचा मुहूर्त साधत नाशिककरांनी ब्रम्हेचा इस्टेट येथे गर्दी केली. उद्या...