Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाच्या आमदाराची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल... काय आहे...

शिंदे गटाच्या आमदाराची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण?

मुंबई । Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रताप सरनाईक यांची जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २०२१ चं आहे. प्रताप सरनाईक यांना घोडबंदर रोडवरील एका जमिनीचा व्यवहार करायचा होता. त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी मालाडमधील एका व्यक्तीला संपर्क साधला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव आहे. सरनाईक यांनी या व्यक्तीला या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही झाला होता. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही त्या व्यक्तीने घोडबंदर रोडवरच्या जमिनीचे पेपर सरनाईक यांच्या नावावर केले नाहीत. सरनाईक यांना पैसेही दिले नाही. त्यामुळे सरनाईक चांगलेच वैतागले होते. पैसे मिळावेत किंवा जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून सरनाईक सातत्याने प्रयत्न करत होते. सरनाईक हे २०२१ पासून सातत्याने जमिनीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, संबंधित व्यक्तीकडून त्याची टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर सरनाईक यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीने बँकेचे हप्ते भरले नाहीत म्हणून सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रारही केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या