पाचोरा । प्रतिनिधी –
आमदार किशोर आप्पा पाटील हे विकास कामांमध्ये अग्रेसर तर आहेतच मात्र मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे नेतृत्व असून सर्वांना आपल्या अडीअडचणीच्या काळात त्याचे सावलीचे झाड जणू ते वाटावेत असे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याचे भावोद्गार शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने केले.
पाचोरा शहरातील आठवडे बाजार भागात शनिवारी संध्याकाळी 7 वाजता झालेल्या प्रचार सभेत मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खर्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला असून आगामी डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना पंधराशे नव्हे तर तब्बल 2100 रुपये मिळणार असून शेतकर्यांचा सातबारा देखील कोरा करण्याचे अभिवचन महायुती शासनाच्या वतीने या ठिकाणी जनतेला देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. वैशाली सूर्यवंशी यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या की,त्या महिला असून महिलांच्या भावनांची खिल्ली उडवणार्या वैशाली सूर्यवंशी यांना आगामी निवडणुकीत महिला भगिनीच आपली जागा दाखवावी असे आवाहन शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केले. स्वतःला कृषी कन्या म्हणून मिरवणार्या वैशाली सूर्यवंशींना यापूर्वी शेतकर्यांसाठी कोणता लढा दिला याची त्यांनी जनतेला सांगावे तसेच अमोल शिंदे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून मिरवतात मात्र त्यांनी शेतकर्यांच्या जमिनी लाटण्याचे धंदे केले असून ते जनतेसमोर उघडे पडले आहेत अशी ही टीका त्यांनी केली.
यावेळी मंचावर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह डॉक्टर प्रियंका पाटील भाजपा विधानसभा निरीक्षक प्रेमसिंह गोल,कांतीलाल जैन,संजय गोहिल,नंदू सोमवंशी,रविंद्र पाटील, बंडू चौधरी सुमित सावंत मंदाकिनी पारोचे प्रियंका पाटील बापू हटकर संगीता पगारे संगीता साळुंखे बेबाबाई पाटील मालती हटकर सुनंदा महाजन, एडवोकेट रोहित ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती. यावेळी सागर सोनार अॅड. रोहित ब्राह्मणे यांची समायोजित भाषणे झाली आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील मनोगत आतून पाचोरा मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा घेत विरोधकांवर टीका केली तसेच आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत असून मायबाप जनता आपल्याला निश्चितपणे कौल देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.