Saturday, July 27, 2024
Homeनाशिकएक सही राष्ट्रीय आदिवासी क्रांतिवीर स्मारकासाठी!

एक सही राष्ट्रीय आदिवासी क्रांतिवीर स्मारकासाठी!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक आदिवासी क्रांतीवीरांनी ईश्वर पराक्रम गाजवले विद्रोह संग्राम उभारून इंग्रजांना कडवी झुंज दिली. या संग्रामात त्यांनी आपल्या प्राणाची ही आहुती दिली. त्यांच्या स्मृतींची आणि पराक्रमाची मागील 75 वर्षात जेवढी घ्यायला हवी होती तेवढी दखल घेतली गेली नाही.

- Advertisement -

याच विचारातून जागर प्रतिष्ठान भारत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद सानप यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये राष्ट्रीय आदिवासी क्रांतिवीर स्मारक व्हावे या मागणीसाठी 10 दिवसांपासून शहरात पदयात्रेद्वारे सह्यांची मोहीम राबवली. आदिवासी क्रांतिवीर स्मारक समितीच्या माध्यमातून 32 हजारांहून अधिक सह्यांचे पत्रक संकलित करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महिनाभर चालणार्‍या या पदयात्रेतून जमा होणारी पत्रे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले जाणार आहेत. पुढील वर्षी अर्थात आदिवासी दिन 9 ऑगस्ट 2024 पर्यंत राष्ट्रीय आदिवासी क्रांतिवीर स्मारक नाशिक शहरात आकारास यावे, अशी मागणी केली जाणार आहे.

मोहीम यशस्वितेसाठी चेतन ब्राम्हणे , जगदीश पाडवी, विद्याधर गवळी, भुसारे सर,सुरेंद्र चौरे,मयूर गायकवाड,पल्लू गुंजाळ,सुकदेव गोधडे,विनय दाढळ,विशाल बर्डे, शंकर पवार,विशाल काळे,तुषार गांगुर्डे,ओंकार गाडगीळ, जितेश भोईर, जीवन रोकडे,वाल्मिक गोरे,विजय आव्हाड,हरिश् गवळी, अभिषेक बागुल,स्वप्नील खंबाईत,प्रशांत चौधरी, जीवन गायकवाड,राहुल अहिरे आदी प्रयत्नशील होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या