Wednesday, May 29, 2024
Homeनंदुरबारचौगाव येथील स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी

चौगाव येथील स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चौगाव बु. (Chaugaon) येथील स्वस्त धान्य दुकानाची (cheap grain shop) अचानक तपासणी (surprise inspection) असता दुकानात धान्य वाटप (Variance in grain distribution) व शिल्लक साठ्यात (balance stock) तफावत आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) सदर दुकानावर कारवाई (action) करण्याची सूचना पुरवठा शाखेला दिली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई मुळे तालुक्यात रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी गुरुवारी तळोदा तालुक्याला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन कामांची माहिती घेतली होती. त्यांनी तळोदा तालुक्यातील चौगाव बु. येथेही मानव विकास अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली होती.

सहाजिकच चौगाव गावात आल्याने त्यांनी गावातील स्वस्त धान्य दुकानास भेट दिली होती या भेटीत त्यांनी दुकानदाराचे रजिस्टर ची तपासणी केली.

यात पॉश यंत्राची तपासणीत त्यांना वाटप केलेले धान्य व शिल्लक राहिले ले धान्य यात तफावत आढळून आली पॉश यंत्रात 84 टक्के धान्य वाटप केल्याचे दिसून आले शिवाय दुकान दाराकडे 25 क्विंटल धान्य चा साठा ही आढळून आला त्यामुळे त्यांनी सदर दुकानावर कारवाई करून तसा अहवाल पाठवण्याची सूचना तळोदा पुरवठा शाखेस दिली.

त्यामुळे पुरवठा शाखेनेही पुढील कार्यवाही साठी शुक्रवारी तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला चे सूत्रांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. मैनेक घोष, तहसीलदार गिरीश वाखारे, नायब तहसीलदार शैलेश गवते, पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे उपस्थित होते.

भरारी पथक स्थापन करण्याचा सूचना

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी गुरुवारी तळोदा येथे भेट दिली त्यावेळी गोदामाचीही तपासणी करून धान्याचा साठयाची चौकशी केली होती. सार्वजनिक वितरण प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील रेशन दुकानांची तपासणी होणेही आवश्यक आहे. त्यामुळे स्वतंत्र भरारी पथक तातडीने नियुक्त करण्याची सूचना महसूल प्रशासनास देऊन तसा अहवाल इकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा प्रशासनाचा या आदेशामुळे साहजिकच रेशन दुकानांमधील धान्य वितरण पारदर्शी होण्यास मदत होईल या आदेशाचे ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या