Saturday, May 25, 2024
Homeजळगावअमळनेर : कोविड सेंटरमधून एक संशयीत रूग्ण गायब

अमळनेर : कोविड सेंटरमधून एक संशयीत रूग्ण गायब

अमळनेर – प्रतिनिधी Amalner

येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटर मध्ये ६८ नंबरच्या खोलीत दाखल असलेला एक इसम गेल्या तीन दिवसापासून गायब झाल्याने त्यांच्या पुतण्याने तक्रार केली असून माजी आ.स्मिता वाघ यांनी यात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

- Advertisement -

हा रुग्ण स्वॅब घेण्यापूर्वीच तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने त्यांच्या पूतण्याने माजी आमदार स्मिता वाघ यांचेकडे कैफीयत मांडली त्यांनी प्रशासनाला जाब विचारीत नाराजी व्यक्त केली. या कोविड सेंटरला पोलीस बंदोबस्त असताना देखील या ठिकाणाहून व्यक्ती गायब कशी होते याचा जाब त्यांनी इनसिडन्ट कमांडर नात्याने उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे याना विचारला आहे.

याबाबत माहिती अशी की मंगेश वाणी यांनी दि.९ रोजी बापू वाणी याना कोविड सेंटरला दाखल करून त्याची नोंदणी केली व रूम नं. ६८ मध्ये बसवून आले होते.

दि.११ रोजी ते काकांची विचारपूस करायला गेले असता त्यांना ते आदल्या दिवसापासून शनिवार दुपारपासून गायब असल्याचे सांगण्यात आले त्याबाबत मंगेश वाणी यांनी विचारले असता तेथील लोकांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंगेश वाणी यांनी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्याकडे लेखी तक्रार दिली.

त्यावरून स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत याना तक्रार करून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला बंदोबस्त ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. प्रताप महाविद्यालयातून बाहेर जाण्यासाठी एकमेव रस्ता असून देखील वृद्ध बाहेर जातो कसा पोलिसांचे लक्ष नव्हते की पोलीस बंदोबस्ताला नव्हते? प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यापूर्वी देखील काही रुग्ण दाखल असताना घरी निघून जात होते जळगाव येथे जसा प्रकार घडला तसा घडू नये म्हणून प्रशासनाने ताबडतोब त्याचा शोध घ्यावा आणि बेजबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे.

दरम्यान प्रशासन त्यांचा शोध घेत असून काल ते गलवाडे येथे एकाला दिसल्याचे प्रांत सिमा आहिरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या