Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याशहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

नाशिक |प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटी (smart city) च्या माध्यमातून शहरांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्ही (cctv)कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून या माध्यमातून आता शहरावर तिसर्‍या डोळ्याची नजर राहणार आहे. त्यातील निर्धारित ठिकाणचे कॅमेरे हे पोलीस (police) यंत्रणेच्या नियंत्रणाखाली तर उर्वरित सर्व कॅमेरे हे मनपा प्रशासनाच्या मुख्य कंट्रोल रूम(control room)मध्ये नियंत्रणात राहणार आहेत.

- Advertisement -

बेशिस्त नागरीकांसह वाहनांना शिस्त लावणे, शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चैन स्नॅचिंग च्या प्रकाराला आळा घालणे, शहरात वाढणारी गुंडगिरी व दहशतवादाला (terrorism) पायबंद घालण्याच्या बहुउद्देशीय प्रकल्पातून शहरात सुमारे 800 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आला होता.

या अंतर्गत आतापर्यंत शहर परिसरात 435 कॅमेरे (camera) बसवण्यात आले आहे. प्रत्यक्षात शहरातील विविध सिग्नल्सवर, मनपाच्या सर्व कार्यालयांवर, सर्व शासकिय रुग्णालये, पोलिसांनी निवडलेले महत्त्वाचे चौक, मनपाने निश्चित केलेले ब्लॅक स्पॉट अशा विविध ठिकाणी हे कॅमेरे लावले जाणार आहेत. या माध्यमातून शहराच्या सुरक्षिततेसाठी थेट उपाययोजना करता येणे शक्य होणार असल्याचे दिसून येत आहे.

बसविण्यात आलेल्या कॅमेर्‍यांमध्ये 360 अंशामध्येे प्रतिमा दाखवणारा पिटीझेड कॅमेरा,चांगल्या गुणवत्तेचे शंभर मीटर पर्यंतचे छायाचित्र दाखवणारा फिक्स बॉक्स कॅमेरा, बेशिस्त वाहन चालकांची नंबर प्लेट थेट स्क्रिनवर दाखवणारा एएनपीआर कॅमेरा, पोलिसांनी निश्चित केलेल्या जागांवर जर काही विपरित घटना घडल्यास कंट्रोल रुममध्ये थेट लाल दिव्याच्या माध्यमातून सूचना देणारा आरएलव्हीडी अर्थात रेड लाइट वायलन्स डिटेक्शन कॅमेरा असे चार प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या