Friday, May 3, 2024
HomeUncategorizedतीन संघामध्ये १८ जुलैला रंगणार क्रिकेट सामना

तीन संघामध्ये १८ जुलैला रंगणार क्रिकेट सामना

जोहान्सबर्ग –

तब्बल दोन-अडीच महिन्यांनी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आफ्रिकेतही क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण, हा क्रिकेट सामना थोडा वेगळा असेल, इथे तीन संघांमध्ये एक सामना होणार आहे.

- Advertisement -

या सामन्यात एबी डिव्हिलियर्स यांच्यासह आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर २७ जूनला हा सामना होणार होता, परंतु त्याची नवीन तारीख दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळानं नुकतीच जाहीर केल्याने हा सामना हा सामना १८ जुलैला होणार आहे. किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे या संघांची नावं असून कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत.

असे असतील सामन्याचे नियम

Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात ८ खेळाडूंचा समावेश असेल आणि ३६ घटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला १२ षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे. एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध ६-६ षटकांच्या ब्रेकसह १२ षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल. प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो.

१२ षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसर्‍या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या