Saturday, November 23, 2024
Homeनाशिकबोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका नसल्याने अनोखे आंदोलन

बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका नसल्याने अनोखे आंदोलन

प्रतिनिधी | बोरगाव
गेल्या दोन महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हाल होत आहेत. प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीने बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी (दि.२७) रोजी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका हरवली आहे, असे बॅनर ला पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते. बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु १०८ रुग्णवाहिका नसल्याने नाहक काही रुग्णांचा उपचाराअभावी मूत्यु झाल्याच्या घटना घडत आहेत.

- Advertisement -

यासर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, दिपक गांगुर्डे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

प्रशासन हे सुरगाणा तालुक्याला वाळीत टाकल्या सारखा प्रकार करत असल्याने आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे. १०८ रुग्णवाहिका नसल्याने तीन महिन्यांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यास कोण जबाबदार असेल हा प्रश्न पडला आहे.
-सचिन राऊत, आदिवासी आसरा फाउंडेशन अध्यक्ष

१०८ रुग्णवाहिका सेवा अत्यावश्यक सेवा असून नियमित रुग्णवाहिका नसणे ही गंभीर बाब आहे. याबाबत आमच्या स्तरावरून कायम स्वरुपी अंबुलन्स द्यावी. यासाठी वरीष्ठ अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.

रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या