अंबासन । वार्ताहर Ambasan
येथील शिरवाळ बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून 28 वर्षीय युवक शेतकर्याचा अंत झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
येथील शिवबान फाट्यावरील युवक शेतकरी रोहित उर्फ बाळा संजय कोर (28) हा शेतीच्या कामासाठी शिरवळणार्यातील बंधार्यावरून जात असताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडाला. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकर्यांनी व तरुणांनी बघताच घटनास्थळी धाव घेत रोहित कोर यास तातडीने पाण्यातून बाहेर काढत त्याला उपचारासाठी नामपुर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद शहाबाद यांनी तपासणी करून मृत घोषित केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महाशिवरात्रीच्या दिवशीच युवा शेतकरी रोहित यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती गावात वार्यासारखे पसरताच नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद या घटनेची केली आहे. सायंकाळी शोकाकुल वातावरणात रोहितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोहितच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन महिन्याची मुलगी व बहीण असा परिवार आहे. दोन महिण्याच्या त्या चिमुकलया जिवाला बापाची ओळख झाली सुद्धा नसतांनां तिच्या डोक्यावरून बापाचा मायेने फिरणारा हात हिरावला गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.