Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखजीवनकौशल्यांची रुजवण कमी पडते का?

जीवनकौशल्यांची रुजवण कमी पडते का?

युवा पिढीतील वाढत्या आत्त्महत्यांची सामाजिक समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. नुकतीच सोलापुरात एका तरुणाने आत्महत्या केली. तो वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होता. आत्महत्या करण्यापूर्वी आईवडिलांना लिहिलेले पत्र सापडल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. अशा दुर्दैवी घटना अधूनमधून घडतात. किशोरवयीन वयात आत्महत्या हे मृत्यूचे चोथे कारण आहे असा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा अन्य पारंपरिक-अपारंपरिक क्षेत्रात करियर घडवणे सोपे नाही. अनेकांचे ते स्वप्न असते. त्याची पूर्तता होण्यासाठी युवांना जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे काहींची स्वप्नपूर्ती होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या