Thursday, July 4, 2024
Homeक्राईमनाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पैशांची पाकिटे असलेल्या एकास पोलिसांनी रंगेहाथ पकडले

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पैशांची पाकिटे असलेल्या एकास पोलिसांनी रंगेहाथ पकडले

नाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ६४.४१ टक्के मतदान

नाशिक | Nashik

- Advertisement -

आज सकाळपासून विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी (Nashik Teachers Constituency) नाशिक विभागातील ९० मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. यात नाशिक जिल्ह्यातील २९ मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान काही मतदान केंद्रांवर संथगतीने सुरु असल्याने शिक्षक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या मतदारसंघांसाठी सकाळपासून मतदान सुरु; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तर दुसरीकडे शहरातील बीडी भालेकर (BD Bhalekar) येथील मतदान केंद्राबाहेर एका उमेदवाराच्या प्रतिनिधीला मतदारांना पैसे वाटप करतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडे पैशाची पाकीटे देखील आढळून आली आहेत. मात्र, हा प्रतिनिधी कोणत्या उमेदवाराचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच सदर प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यावरून प्रशासन आणि पोलीस यांच्यात तू-तू-मै-मै झाल्याचे समजते.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तक्रार दिल्यावर या प्रतिनिधीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शहरातील बीडी भालेकर येथील एका शाळेत नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान सुरु असताना दुपारी एक वाजेनंतर मतदारांची याठिकाणी गर्दी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षक हैराण झाले.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : राहाता येथील केंद्रावर मतदानासाठी रांगाच रांगा!

नाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ६४.४१ टक्के मतदान

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान (Voting) सुरु झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत ८ टक्के इतके मतदान झाले होते. तर सकाळी अकरा वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले होते. यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत ४३.४७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हीच मतदानाची आकडेवारी वाढून दुपारी तीन वाजेपर्यंत ६४.४१ टक्के इतकी झाली. यात नाशिक ६०.४२, नंदुरबार ७२.७९,धुळे ६७.४१, जळगाव ६१.१३ आणि नगरमध्ये ६०.४२ टक्के मतदान झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील ६९ हजार ३६८ मतदारांपैकी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या