Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDhurandhar 2: जबरदस्त ॲक्शन, रक्तरंजित थरार, "ये नया हिंदुस्थान" है म्हणत 'धुरंधर...

Dhurandhar 2: जबरदस्त ॲक्शन, रक्तरंजित थरार, “ये नया हिंदुस्थान” है म्हणत ‘धुरंधर २’ चा टीझर रिलीज

मुंबई | Mumbai
सगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्या धुरंधर फिल्मच्यी सीक्वेलचा टिझर अखेर आला आहे. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी, रणवीर सिंहने चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले. त्याच्या पोस्टमध्ये त्याने दुपारी १२ १२ हा आकडा टाकला होता. तेव्हापासून सगळेजण टिझर कधी प्रदर्शित होतो याची वाटच पाहत होते. अखेर हा टिझर रिलिज झाला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर पार्ट २’चा जबरदस्त टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये हमजा अली मजारी अर्थात रणवीर सिंगचं पूर्वायुष्य दिसणार आहे. शांत, साध्या स्वभावाचा हमजा ‘धुरंधर’ कसा झाला, याचा प्रवास ‘धुरंधर पार्ट २’मध्ये दिसणार आहे.

- Advertisement -

‘ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी’ अशा वाक्यासह अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचा टिझर पोस्ट केला आहे. धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचं नाव धुरंधर 2 नाही तर धुरंधर : द रिव्हेंज असं आहे.

या टीझरमध्ये एक खास गोष्ट बघायला मिळाली आहे. पहिल्या भागात अक्षय खन्ना ‘शेर ए बलोच’ झाला होता आणि त्याने केलेला डान्स चांगलाच गाजला होता. आता दुसऱ्या भागात रणवीर सिंग ‘शेर ए बलोच’च्या गादीवर बसलेला दिसतोय. याशिवाय पुन्हा एकदा Fa9la गाण्याची झलक दिसतेय. या सोबतच रणवीर सिंग म्हणजेच हमझा अली मझारीचा खुंखार अवतार ही बघायला मिळतोय. धुरंधर २ चा भाग दोन हा ॲक्शनने भरलेला असल्याचे टीझरमधून बघायला मिळतेय.

Sanjay Raut: विमान अपघाताबाबात संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, “ऑपरेशन लोटसचा…”

दरम्यान, १९ मार्च २०२६ ला ‘धुरंधर पार्ट २’ रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा रणवीर सिंगसह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, आर.माधवन या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ‘धुरंधर’चा पहिला भाग गाजवणारा अक्षय खन्ना या दुसऱ्या भागात दिसणार की नाही, याची सर्वांना उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दहाव्या मैलाजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
नाशिक | Nashik मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट परिसरात आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याची...