Sunday, October 18, 2026
Homeनाशिकधबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव तालुक्यातील कासारी येथील चांदेश्वरी धबधब्यावर वाहत्या पाण्यात पाय घसरुन खोल पाण्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. भगवान वाघ असं तरुणाचं नाव आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल प्रभाकर मढीकर रा.लासूर जि .संभाजीनगर याने खबर दिली. गुरुवारी (दि.१३) रोजी सायंकाळी ४/३० वाजेच्या सुमारास भगवान भरत वाघ (३२) रा.रामवाडी, ता.वैजापूर, छत्रपती संभाजी नगर हा त्याचे मित्रांसोबत तालुक्यातील कासारी चांदेश्वरी धबधबा इथे गेला होता. आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र वाहत्या पाण्यात उभं राहिल्याने पाय घसरुन तो खोल पाण्यात पडला.त्याच्या डोक्यास,कपाळावर हाताला जबर मार लागला.

याचवेळी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉ. राठोड यांनी भगवान यास मयत घोषित केले.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...