Monday, May 5, 2025
Homeधुळे...या कारणासाठी धुळ्यात तरूणाला झाली अटक

…या कारणासाठी धुळ्यात तरूणाला झाली अटक

धुळे । dhule । प्रतिनिधी

येथील चाळीसगाव रोड पोलिसांनी युवकांना गुंगीचे औषधे विक्री करणार्‍या तरूणाला (young man) जेरबंद (arrested) केले आहे. त्यांच्याकडून 46 हजारांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अंबिका नगरातील हॉटेल डीडीआरसीच्या मागे सार्वजनिक ठिकाणी सुलतान युसुफ शेख (रा.शहादब नगर, वडजाई रोड, धुळे) हा अवैधरित्या गुंगी आणणार्‍या औषधांची चोरटी विक्री करत असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकाने कायदेशीर बाबींची पुर्तता करत अन्न औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची मदत घेत घटनास्थळ छापा टाकत सुलतानला अटक केली. त्याच्याकडे कोरेक्स औषधाच्या 43 बाटल्या तसेच अ‍ॅक्टीव्ह नावाचे निळे झाकण असलेल्या 10 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून या गुंगीच्या बाटल्यांसह 40 हजार रुपये किंमतीचे एम.एच.15 सी.एफ. 7432 क्रमांकाची दुचाकी, 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 1 हजार रुपयांची रोकड असा 55 हजार 420 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोसई विनोद पवार करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

HSC Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल, नाशिक...

0
नाशिक | Nashik  इयत्ता बारावीच्या (HSC Exam) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल (Result) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे....