Thursday, March 27, 2025
Homeनाशिकमोबाईलच्या वादातून मारहाण करत तरुणाचा खून

मोबाईलच्या वादातून मारहाण करत तरुणाचा खून

पिंपळगाव बसवंत। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

मोबाइलच्या वादातून चौघांनी मिळून एकाला मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी रोड येथील बेंदमळा शिवारात घडली. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी काही तासांतच चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना जेरबंद केले आहे. सुरेश शिवराम भोये वय असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत वशाबाई सुरेश भोये वय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.8) रात्री 9 च्या सुमारास बाळासाहेब विधाते यांच्या वणी रोड परिसरातील बेंद मळ्यात संशयित आरोपी योगेश शेवरे, समाधान सोनवणे, अंकुश कराटे उर्फ लंगडया, सुनील खराटे फरार असून पूर्ण नाव व गाव माहित नाही. यांनी फिर्यादीच्या घरासमोरील शेडमध्ये येऊन फिर्यादीचे पती सुरेश शिवराम भोये झोपलेले असताना त्याला मारहाण केली. फिर्यादीस घराबाहेर ओरडण्याचा आवाज आल्याने त्या तत्काळ शेडमध्ये गेल्या. पतीला संशयित आरोपी शिवीगाळ करून मारीत होते. त्यातील योगेश हा सुरेशकडे मोबाइल मागत होता. मोबाइल देण्यास नकार दिल्याने राग आल्याने त्याने जवळ पडलेल्या लाकडी ढपलीने मारहाण केली. तसेच फिर्यादी सोडविण्यास गेली असता इतरांनी तिलाही मारहाण केली.

या मारहाणीत सुरेश यांचा मृत्यू झाला. यावेळी मयताच्या पत्नीस म्हणजे फिर्यादीस तू जर याबाबत कोणास माहिती दिली तर तुला देखील मारून टाकू. असा दम देऊन संशयित पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी तीन आरोपींचा शोध घेत त्यांना तत्काळ अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस तसेच पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पो.हवा. विलास गांगोडे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकला विमान देखभाल दुरुस्ती यंत्रणा कार्यान्वित

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिक विमानतळावरून आता विमान देखभाल दुरुस्तीचे (एमआरओ) कामही गतिमान झाल्यामुळे अप्रत्यक्षपणे जगाच्या नकाशावर नाशिकचे नाव अधोरेखीत झाले आहे.विमान दूरुस्तीसाठी जगभरातून विमान...