दोंडाईचा । श.प्र.
गुजरात (Gujarat) येथील साईनाथ ट्रॅव्हल्स (Sainath Travels) चालकाचा हलगर्जी आणि निष्काळजीपणा तरूणाच्या जिवावर बेतला आहे. बसमध्ये चढत असतांनाच चालकाने अचानक बस सुरू केल्याने खाली पडून चाकाच्या खाली येवून तरूण ठार झाला. याप्रकरणी चार दिवसानंतर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
किरण रामा गवळी (वय 25 रा. दहिवद जि. नंदुरबार) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दि.3 रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेदरम्यान गावी जाण्यासाठी चोपडाकडून सुरतकडे जाणार्या साईनाथ ट्रॅव्हल्समध्ये (क्र.जीजे 14 झेड 6636) चढला. पंरतू चालकाने प्रवासी बसमध्ये पुर्णपणे चढल्याची खात्री न करता बसला गती दिली.
त्यामुळे बसमध्ये चढत असतांना किरण हा दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावरील वीज कंपनीच्या सबस्टेशनजवळील हॉटेल आशिष परमिटरूम बिअरबारच्या बोर्डाजवळ बसमधून रस्त्यावर खाली पडून गाडीच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस बस चालक कारणीभूत असल्याने चालकावर दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहकाँ निंबाळे करीत आहेत.