Thursday, March 13, 2025
Homeजळगावचौथ्या मजल्यावरून पडून तरूणी ठार

चौथ्या मजल्यावरून पडून तरूणी ठार

जळगाव – jalgaon
शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून मामाकडे आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर मंगळवारी काळाने घाला घातला. ऐन सणासुदीत तरूणीचा अपघाती मृत्यू झाल्याने गजरे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. मुंदडा नगरात 19 वर्षीय तरुणी चौथ्या मजल्यावरील गॅलरीत वाळवलेले कपडे काढण्यासाठी गेली होती. तारावरील साडी काढताना अचानक तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरुन डोक्यावर पडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रेरणाच्या मृत्यूने यावल येथील राहत्या परिसरात मोठी शोककळा पसरली.

प्रेरणा विजय गजरे (वय 19 रा.यावल) ही यावल महाविद्यालयात एसवाय बीएला शिकणारी विद्यार्थिनी शाळेला सुटी लागल्याने जळगाव ये्थे वडिलांसोबत मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील मुंदडा नगरात असलेल्या मामाच्या घरी आली होती. दुपारी 2 वाजेच्या सुमारास प्रेरणा गॅलरीत वाळवलेले कपडे काढण्यासाठी चौथ्या मजल्यावरील गॅलरीत कपडे काढताना अचानक हाताने साडी काढताना तोल गेल्याने ती चौथ्या मजल्यावरून जमिनीवर पडली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी शेजारील रहिवासी व नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी निखील तायडे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. प्रेरणाच्या पश्चात वडील, आई व बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...