धुळे dhule । प्रतिनिधी
तालुक्यातील रतनपुरा बोरकुंड (Borkund) शिवारात व्यवसायानिमित्त आलेल्या सातार्यातील तरूणाचा (youth)एका हत्याराच्या सहाय्याने निर्घुण हत्या (brutally murdered) करण्यात आली. आज सकाळी ही खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
आदर्श दत्तात्रय पिसाळ (वय 23 रा. शेरेशिंदेवाडी जि. सातारा) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्याच्यासह त्यांच्या गावातील आणखी एक जण शेती सपाटीकर करण्याचा व्यवसायानिमित्त रतनपुरा येथे आले होते. आज सकाळी गाव शिवारातील शेतात उभ्या एमएच 11 डीए 1739 क्रमांकाच्या ट्रॅक्टरजवळ आदर्श पिसाळ हा मृतावस्थेत पडलेला होता. काल सायंकाळी शेतातून जाणार्या-येणार्यांना तो झोपलेला असावा, म्हणून कोणी लक्ष दिले नाही.
पंरतू सकाळी शंका आल्याने जवळ जावून पाहिले तेव्हा आदर्श याच्या चेहेर्याला गंभीररित्या मारून त्याचा कोणीतरी हत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच फॉरेन्सीक व श्वान पथकाला पाचारण केले.
यावेळी एलसीबीचे पथक तसेच पोकॉ प्रविण पाटील, योगेश सोनार, निलेश पाटील, कांतीलाल शिरसाठ, सरपंच, पोलिस पाटील उपस्थित होते. पंचनामा करून मयत आदर्श यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तरूणाच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असून पोलिस तपास करीत आहेत.