Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याNashik News : आदित्य ठाकरे-दादा भुसेंची नाशिकमध्ये गुप्त भेट? दोघांनीही दिले 'हे'...

Nashik News : आदित्य ठाकरे-दादा भुसेंची नाशिकमध्ये गुप्त भेट? दोघांनीही दिले ‘हे’ स्पष्टीकरण

नाशिक | Nashik

राज्याचे माजी मंत्री व ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) हे आज एका कार्यक्रमानिमित्त नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची नाशिकमधील एका रिसॉर्टमध्ये गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता या भेटीवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे…

- Advertisement -

Nashik News : तलाठी परीक्षा गैरप्रकार प्रकरण; संशयित निघाला मास्टरमाईंड, चौकशीसाठी पथक रवाना

या भेटीवर प्रतिक्रिया देतांना पालकमंत्री भुसे म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांच्या भेटीचा विषयच नाही. मी सकाळी मुंबईहून (Mumbai) निघालो. दुपारी बारा वाजता नाशिकला आलो. मी बारा वाजता नाशिकमध्ये पत्रकार परिषदही घेतली. त्यानंतर दुपारी दोन ते चारच्या दरम्यान मराठा विद्या प्रसारक (MVP) संस्थेच्या समाजदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम संपल्यानंतर मी माझ्या खाजगी गाडीतून नातीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलो. तिचा आज पहिला वाढदिवस होता. मालेगाव तालुक्यात पाऊस कमी आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही मालेगावात वाढदिवस साजरा न करता मालेगावात (Malegaon) कुटुंबियांना बोलावून घेतले. याठिकाणी आम्ही छोटेखानी कार्यक्रम करत आहोत”, असे दादा भुसे यांनी सांगितले.

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी जाऊन केला गौरव

तर आदित्य ठाकरे या भेटीवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, “दादा भुसे आणि माझी कुठेही भेट झाली नाही. ते खरंच तिथे होते? आपण सगळे तिथे होता. अशी छुपी भेट नाही किंवा हुडी घालून मी कुणाला भेटायला जात नाही. मुख्य गोष्ट ही होती की, अनेक दिवसांपासून मला त्या रिसॉर्टला भेट द्यायची इच्छा होती. इथल्याच व्यक्तीने ते रिसॉर्ट बनवले आहे. मला ते बघायचे होते. मी पर्यटन मंत्री होतो तेव्हापासून या रिसॉर्टबद्दल ऐकत होतो. आज संधी मिळाली. मध्ये मी एका लग्नासाठी आलो होतो. या रिसोर्टमध्ये पर्यावरण (Environment) आणि पर्यटन एकत्र केले आहे. म्हणून मी ते बघायला गेलो. छुप्या भेटींची गरज नाही. जे असतं ते जगजाहीर असतं असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maharashtra Politics : “सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुख्य खुर्ची बदलणार”; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

- Advertisment -

ताज्या बातम्या