Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAaditya Thackeray : राज्य सरकारकडून फक्त 'खोके दो, धोके लो' योजना सुरु;...

Aaditya Thackeray : राज्य सरकारकडून फक्त ‘खोके दो, धोके लो’ योजना सुरु; आदित्य ठाकरेंचा घणाघात

येवला | Yeola

- Advertisement -

युवासेनाप्रमुख आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे महाराष्ट्र स्वाभिमान दौऱ्याच्या निमिताने दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. काल त्यांची नाशकातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा झाला. त्यानंतर आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची येवल्यात (Yeola) सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर विविध मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आपल्या डोक्यावर जे खोके सरकार बसले आहे त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठविले आहेत. त्यांच्याकडे फक्त ‘खोके दो, धोके लो’ अशा योजना सुरु आहेत. मुख्यमंत्री धतुरमातुर योजनांवर सही करून राज्यात नवीन उद्योग आणत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi Government) होते त्यावेळी करोना काळात साडे सहा लाखांचे उद्योग आणले. मात्र, या सरकारने आणलेले उद्योग सर्व गुजरातला गेले आहेत”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा; म्हणाले, “आमचा मुलगा…”

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “आज आपण शेतीमध्ये किंवा उद्योगात पुढे जात नाही आहोत त्याला जबाबदार राज्यातील खोके सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. त्यावेळी कुठलीही निवडणूक समोर नसताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतचे कर्ज दोन महिन्यात माफ केले. यात फडणवीसांनी त्यांच्या सरकारच्या काळात जी कर्जमाफी केली त्याच्यात जेवढ्या जाचक अटी होत्या तेवढ्या नव्हत्या”, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

तसेच करोनाच्या काळात कुठल्याही पिकांवर आपत्ती आली तरी जेवढी काही मदत शक्य होती तेवढी मविआच्या काळात केली गेली.आज आपण शेतकर्‍यांना मदत द्या असे सांगत होतो. मात्र त्यांनी लाडकी बहीण योजना आणून शेतकऱ्यांची बोळवण केली. पंतप्रधान मोदी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणाले होते की, आमचे सरकार आल्यास आम्ही प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख देऊ. मात्र,आता ते पंधराशेवर आले आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर या सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील १५०० रुपये आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लाडकी बहीण योजनेची रकम दुप्पट करावी, नाहीतर आमचे सरकार आल्यास आम्ही ती वाढवून देऊ, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, “काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने जी कांद्यावर निर्यातबंदी आणली होती. त्यावेळी पहिली निर्यातबंदी ही गुजरातची उठवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राची उठविण्यात आली. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राला अडविण्याचे काम राज्य सरकारकडून सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदेंना जो पर्यंत हद्दपार करत नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नाही, असा निर्धारही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दोन महिन्यापूर्वी राज्यात एका मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी दिली गेली. मात्र, ती कुठल्या चौकात दिली, कुणाला दिली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. कारण फाशीबद्दल मुख्यमंत्री सफ्शेल खोट बोलत असून महाराष्ट्राला खोटे बोलणारे चालत नाहीत”, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या