Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्याAaditya Thackeray : मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? सदा सरवणकरांच्या नियुक्तीवरून...

Aaditya Thackeray : मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? सदा सरवणकरांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

मुंबई | Mumbai

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांचा सिद्धिविनायक मंदिर न्यासा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्या जागी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांची (Sada Saravankar) नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून आता दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून सरवणकर यांच्या नियुक्तीवरुन माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी एक्स (ट्वीट) अकाऊंटवर पोस्ट करत टीका केली आहे. ‘मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे…

OBC Leaders Meeting : छगन भुजबळांनी बोलावली सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक; काय निर्णय घेणार?

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “दादरमध्ये (Dadar) यापूर्वी घडला नव्हता, असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आले. नंतर पोलिसांनीही सांगितले की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे-भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले, असे ते म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी एक्समध्ये म्हटले आहे की, हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचे लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचे दिसत आहे. मिंधे-भाजप (BJP) गँगच्या गद्दारांचे हे कोणते हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला आहे. तसेच भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचे आणि महाराष्ट्रद्वेषाचे बक्षीस दिले असेल, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

OBC Leaders Meeting : “दिवाळीनंतर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी…”; सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

दरम्यान, गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. तसेच याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. यानंतरआता त्यांची सिद्धीविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारच्या निर्णयावर जोरदार निशाणा साधला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कागदी घोडे नाचवत पाणंद रस्ते योजना कोमात; दिंडोरी पंचायत समितीच्या उदासीन धोरणाचा फटका

- Advertisment -

ताज्या बातम्या