Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजन“आत्महत्या हा विचार खूप भयानक...”; आमिर खानच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

“आत्महत्या हा विचार खूप भयानक…”; आमिर खानच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खानची (Actor Amir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आयरा कधी तिच्या लव्ह लाइफमुळे, तर कधी पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा दी आपल्या आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे बोलताना दिसते. काल ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ (World Suicide Prevention Day) होता. त्यानिमित्तानं आयरा ही रस्त्यावर जनजागृती करताना दिसले. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

- Advertisement -

आयरा खान काल मुंबईतील एका कॅफे समोर दिसली. यावेळी पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. इरा म्हणाली, ‘आज सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. म्हणजे आत्महत्येपासून एखाद्याला रोखण्याचा दिवस. आत्महत्या हा विचार खूपच भयानक आहे. हे लोक कोणाला काही सांगू शकत नाहीत. तुम्ही अशा लोकांना विचारलं त्याबद्दल तर त्यांना वाटेल की कोणीतरी आहेतुम्हाला यावर बोलताना घाबरायची गरज नाही. ज्यांच्याशी आपण यावर बोलू शकतो. आपण त्यांच्याशी या विषयावर बोललो तर उलट त्यांच्या मनात असे विचार येतील असं आपल्याला वाटतं पण असं होत नाही.’ आयराचा हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला असून त्यावर कमेंट करत नेटकरी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. तर ती करत असलेल्या जनजागृतीबद्दल अनेक जण तिचं कौतुकही करत आहेत.

दरम्यान, आयरा खान सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत राहते. तिने काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. सोशल मीडियावर सक्रीय असणारे आयरा आणि नुपूर नेहमी आपले प्रेम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नूपुर व्यवसायाने जिम ट्रेनर आहे. आयरा अनेकदा सोशल मीडियावर नुपूरसोबतचे खासगी फोटो शेअर करत असते. हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Modi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा महान अक्षय वटवृक्ष; पंतप्रधान...

0
नागपूर । Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या...